Wi-Fi : आजच्या डिजिटल युगात वेगवान इंटरनेट कनेक्शन असणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही वायफाय राउटर लावला असला तरी अनेकदा इंटरनेटचा वेग कमी असतो आणि व्हिडिओ बफर होतात. यामागचे कारण फक्त तुमचा इंटरनेट प्लॅन नसून, तुमच्या वायफाय राउटरची चुकीची जागा हे देखील असू शकते. चला तर मग जाणून घेऊया, वायफायचा वेग वाढवण्यासाठी राउटर कुठे आणि कसा ठेवावा.
वायफाय राउटर ठेवण्याची योग्य जागा
- उंचीवर ठेवा: तुमच्या घराच्या किंवा ऑफिसच्या छतावर किंवा उंच ठिकाणी राउटर ठेवा. यामुळे सिग्नल कोणताही अडथळा न येता सर्व दिशांना (360 डिग्री) पसरतो. जमिनीवर किंवा कोपऱ्यात ठेवल्यास सिग्नलला अडथळे येतात आणि वेग कमी होतो.
- मध्यभागी ठेवा: राउटर शक्यतो घराच्या मध्यभागी ठेवा. यामुळे सिग्नल सर्व खोल्यांमध्ये समान प्रमाणात पोहोचेल.्यातून सिग्नल एका वर्तुळात पसरतो आणि घराच्या प्रत्येक कोपऱ्यात हाय-स्पीड नेट पोहोचते.
- इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून दूर ठेवा: मायक्रोवेव्ह ओव्हन, टेलिव्हिजन, आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून राउटर दूर ठेवा. ही उपकरणे वायफायच्या सिग्नलमध्ये अडथळा निर्माण करू शकतात.
राउटरच्या जागेमुळे मिळणारे फायदे
- जास्त कव्हरेज: राउटर उंच ठिकाणी ठेवल्याने सिग्नल खालील बाजूस समान प्रमाणात पसरतो. यामुळे घरातल्या प्रत्येक खोलीत तुम्हाला चांगला वेग मिळेल.
- कार्यक्षमता वाढते: राउटरला नैसर्गिक हवा मिळते आणि तो जास्त गरम होत नाही. यामुळे राउटरची कार्यक्षमता वाढते आणि त्याचे आयुष्यही वाढते. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात याचा खूप फायदा होतो.
- स्थिर वेग: जरी तुमच्या इंटरनेट प्लॅनचा वेग वाढणार नसला तरी, राउटरच्या चांगल्या स्थानामुळे तुमच्या फोन किंवा लॅपटॉपला मिळणारा वेग अधिक स्थिर आणि चांगला होतो.
या सोप्या टिप्स वापरून तुम्ही तुमच्या वायफायचा वेग सहज वाढवू शकता आणि चांगल्या इंटरनेटचा अनुभव घेऊ शकता.