Panjabrao Dakh Hawaman Andaj: राज्यात आता परतीच्या पावसाने जोर धरला आहे. प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाब डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ सप्टेंबरपासून परतीच्या पावसाला सुरुवात होईल आणि १३ ते १७ सप्टेंबर या काळात राज्यात जोरदार पाऊस पडेल.
या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस
१२ सप्टेंबरला हिंगोली, नांदेड, वाशिम, यवतमाळ, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यानंतर १३ सप्टेंबरपासून हा पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात पसरेल.
विशेषतः बीड, नांदेड, लातूर, सोलापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये या काळात चांगला पाऊस होईल, असा अंदाज पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे.
धरणे भरून वाहणार
या पावसामुळे अनेक मोठी धरणे भरून वाहतील, अशी शक्यता आहे. यात जायकवाडी, येलदरी, सिद्धेश्वर, मांजरा, दुधना आणि निळवंडे यांसारख्या मोठ्या धरणांचा समावेश आहे.
ऑक्टोबरमध्येही पावसाची शक्यता
पंजाब डख यांच्या अंदाजानुसार, सप्टेंबरमध्ये आणखी एक परतीचा पाऊस २५ ते २८ सप्टेंबर दरम्यान पडेल. याव्यतिरिक्त, ऑक्टोबरमध्येही १० ते १३ ऑक्टोबर दरम्यान मोठा पाऊस येण्याची शक्यता आहे. १३ ऑक्टोबरपर्यंत राज्यात परतीचा पाऊस राहील आणि त्यानंतर पाऊस पूर्णपणे निघून जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे.