Namo Shetkari 7th Installment List: शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे! राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी ₹१९३२ कोटींहून अधिक निधी मंजूर केले आहे. या योजनेचा लाभ राज्यातील सुमारे ९२.३६ लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे. राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जाहीर केल्याप्रमाणे, ९ आणि १० सप्टेंबर रोजी हा निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात आलेली आहे.
तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल, तर तुमचा हप्ता येणार आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी उत्सुक असाल. ही प्रक्रिया खूप सोपी असून, तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाइलवरून तुमच्या हप्त्याची स्थिती तपासू शकतात.
हप्त्याचा स्टेटस ऑनलाइन कसा तपासावा?
सरकारी कार्यालयात न जाता तुम्ही काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुमच्या हप्त्याची सद्यस्थिती जाणून घेऊ शकतात.
- वेबसाइटला भेट द्या: तुमच्या मोबाइलमधील ब्राउझरवर pfms.nic.in ही अधिकृत वेबसाइट उघडावी.
- मेनूवर क्लिक करा: वेबसाइट उघडल्यावर, उजव्या बाजूला असलेल्या मेनूवर (तीन आडव्या रेषा) क्लिक करायचे.
- ‘पेमेंट स्टेटस’ निवडा: ‘Payment Status’ या पर्यायावर क्लिक करा आणि त्यानंतर ‘DBT Status Tracker’ हा पर्याय निवडायचा.
- माहिती भरा: तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल. येथे, ‘Category’ मध्ये ‘DBT NSMNY Portal’ निवडायचा.
- ॲप्लिकेशन आयडी टाका: तुमचा पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे, तोच तुमचा ‘Application ID’ असेल, तो काळजीपूर्वक नमूद करावे.
- सर्च करा: स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड भरा आणि ‘Search’ बटणावर क्लिक करावे.
तुमचा हप्ता मंजूर झाला आहे का?
‘Search’ बटणावर क्लिक करताच, तुमच्या पेमेंटची सविस्तर माहिती स्क्रीनवर दिसेल. यामध्ये तुमचा अर्ज क्रमांक, नाव, योजनेचा तपशील, आधार क्रमांकाचे शेवटचे चार आकडे आणि ₹२००० रुपयांची रक्कम दिसतात.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘Credit Status’ तपासावे. जर तिथे ‘Payment Pending’ असे दिसत असेल, तर याचा अर्थ तुमचा हप्ता १००% मंजूर झाला आहे आणि लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे.
जर माहिती लगेच दिसली नाहीत, तर घाबरू नका. वेबसाइटवर माहिती अपडेट होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतोय. तुम्ही थोड्या वेळाने किंवा दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रयत्न केल्यास तुमची स्थिती नक्कीच दिसेल. अशा प्रकारे, तुम्ही कोणत्याही त्रासाशिवाय तुमच्या हप्त्याची स्थिती सहजपणे तपासू शकतात.