लाडकी बहीण योजना: महिलांना पुढील हप्ता एकत्र 3000 रुपये मिळणार? चेक करा Ladki Bahin Yojana Next Hapta

Ladki Bahin Yojana Next Hapta: महायुती सरकारने महाराष्ट्रातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू केलेल्या ‘लाडकी बहीण योजने’ने महिलांना मोठा आधार दिला आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १,५०० रुपये दिले जातात. जून २०२४ पासून सुरू झालेल्या या योजनेचे हप्ते आतापर्यंत नियमित जमा झाले आहेत. मात्र, सप्टेंबर महिना सुरू होऊनही ऑगस्टचा हप्ता खात्यात जमा झाला नाही, ज्यामुळे महिलांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रश्नावर महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे.

29 जिल्ह्यात तात्काळ अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार; जिल्ह्यांची यादी पहा ativrushti nuksan bharpai district list
29 जिल्ह्यात तात्काळ अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार; जिल्ह्यांची यादी पहा ativrushti nuksan bharpai district list

ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार?

गेल्या काही दिवसांपासून ऑगस्टचा हप्ता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जमा होईल, अशी चर्चा होती. मात्र, पहिला आठवडा उलटूनही पैसे न आल्याने महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला. यावर आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की, ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा होईल.

त्यांनी सांगितले की, सरकार या योजनेचा लाभ अशाच प्रकारे नियमितपणे सुरू ठेवण्यास कटिबद्ध आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्याचे १५०० रुपये लवकरच जमा होण्याची शक्यता आहे.

पिक विमा पैसे जमा; शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे आले, नवीन यादीत नाव चेक करा! Crop Insurance List 2025
पिक विमा पैसे जमा; शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे आले, नवीन यादीत नाव चेक करा! Crop Insurance List 2025

ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र मिळणार?

काही महिलांकडून ऑगस्ट आणि सप्टेंबर असे दोन्ही हप्ते म्हणजेच ३,००० रुपये एकत्र येणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे, सध्या तरी केवळ ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.

२,१०० रुपये कधी मिळणार?

या योजनेची रक्कम १,५०० वरून २,१०० रुपये कधी होणार, या प्रश्नावर आदिती तटकरे यांनी आश्वासन दिले आहे की, जाहीरनामा हा पाच वर्षांसाठी असतो आणि त्यात दिलेले आश्वासन सरकार नक्कीच पूर्ण करेल. मात्र, सध्या योजनेचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत नियमित पोहोचवणे हे सरकारचे प्राधान्य आहे. योग्य वेळी २,१०० रुपयांचा लाभ महिलांना पोहोचेल, असेही त्यांनी सांगितले.

‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 127 कोटी रुपये पिक विमा थेट बँक खात्यात जमा; यादीत नाव पहा Crop Insurance Payment
‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 127 कोटी रुपये पिक विमा थेट बँक खात्यात जमा; यादीत नाव पहा Crop Insurance Payment

महिलांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि केवळ अधिकृत घोषणांची वाट पाहावी.

Leave a Comment

error: कॉपी होत नाही ⚠️ शेअर करा 📲