IPhone 17 Launch: आयफोन १७ उद्या लाँच होणार! बॅटरीबाबत मोठा खुलासा, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स तंत्रज्ञान जगतातील सर्वात मोठा ब्रँड Apple काल 9 सप्टेंबर रोजी आपला बहुप्रतिक्षित iPhone 17 लाँच केलेला आहे. या मोठ्या इव्हेंटच्या एक दिवस आधीच iPhone 17 च्या बॅटरी क्षमतेबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे, ज्यामुळे उत्सुकता आणखी वाढली आहे.
चायनीज 3C सर्टिफिकेशन डेटाबेस वरून ही माहिती लीक झाली असून, ShrimpApplePro या टिप्सटरने ती ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट केली आहे. या माहितीनुसार, आयफोन १७ सीरिजमध्ये विविध मॉडेल्ससाठी वेगळ्या बॅटरी क्षमता असतील.
आयफोन १७ सीरिजची बॅटरी क्षमता (लीक माहितीनुसार)
मॉडेल | बॅटरी क्षमता (mAh) |
iPhone 17 Air | 3,036 (सिम) / 3,149 (ई-सिम) |
iPhone 17 | 3,692 (बेस मॉडेल) |
iPhone 17 Pro | 3,988 (सिम) / 4,252 (ई-सिम) |
iPhone 17 Pro Max | 4,823 (सिम) / 5,088 (ई-सिम) |
iPhone 17 Pro Max मध्ये ५,०००mAh पेक्षा जास्त क्षमतेची बॅटरी असण्याची शक्यता आहे, जे सध्याच्या iPhone 16 Pro Max पेक्षा सुमारे ८% अधिक आहे. यामुळे हा फोन सर्वाधिक बॅटरी लाईफ देणारा आयफोन ठरू शकतो.
याउलट, iPhone 17 Air या मॉडेलमध्ये सर्वात कमी बॅटरी क्षमता असेल, कारण त्याचा डिझाइन स्लिम ठेवण्यात आला आहे. परंतु, यात नवीन C1 मॉडेम असल्यामुळे कार्यक्षमता अधिक चांगली मिळेल.
Apple च्या आगामी इव्हेंटमध्ये काय-काय लाँच होणार?
आयफोन १७ व्यतिरिक्त Apple या वर्षीच्या इव्हेंटमध्ये आणखी काही नवीन उत्पादने लाँच करू शकते.
- Apple Watch Ultra 3 आणि Apple Series 11
- AirPods Pro 3
- AirTag 2
- Apple TV 4K (4th Gen)
- Apple Watch SE 3
या लाँचमुळे तंत्रज्ञान प्रेमींसाठी ही एक मोठी पर्वणी असणार आहे.