आनंदाची बातमी! आता वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत, लवकर इथे अर्ज करा Gas Cylinder Free

राज्य सरकारने महिलांसाठी आणखी एक महत्त्वपूर्ण योजना जाहीर केली आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादानंतर आता पात्र महिलांना वर्षाला तीन गॅस सिलिंडरचे पुनर्भरण मोफत मिळणार आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजने’च्या आणि राज्य सरकारच्या मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’ च्या लाभार्थ्यांसाठी “मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना” लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

योजनेसाठी पात्रता

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे:

EMI नाही भरला तर स्मार्टफोन होणार लॉक? जाणून घ्या RBI चा नवा नियम!
EMI नाही भरला तर स्मार्टफोन होणार लॉक? जाणून घ्या RBI चा नवा नियम!
  • गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे.
  • तुम्ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे पात्र लाभार्थी असावे.
  • किंवा, तुम्ही ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेचे पात्र लाभार्थी असावे.
  • एका कुटुंबात (शिधापत्रिकेनुसार) केवळ एकच व्यक्ती या योजनेस पात्र असेल.
  • ही योजना फक्त १४.२ किलो वजनाच्या गॅस सिलिंडर ग्राहकांना लागू आहे.
  • या योजनेचा लाभ १ जुलै २०२४ पासून पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांनाच मिळेल. १ जुलै २०२४ नंतर विभक्त केलेल्या शिधापत्रिका या योजनेसाठी पात्र नाहीत.

असे मिळेल योजनेचा फायदा

या योजनेचा लाभ थेट तुमच्या बँक खात्यात जमा केला जाईल. केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या ३०० रुपयांच्या अनुदानासोबतच राज्य सरकारकडून प्रति सिलिंडर ५३० रुपये दिले जातील. या दोन्ही रकमेसह पात्र महिलांना प्रति सिलिंडर एकूण ८३० रुपयांचे अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाईल. एका महिन्यात एका कुटुंबाला एकापेक्षा जास्त सिलिंडरवर अनुदान मिळणार नाही.

योजनेची अंमलबजावणी आणि देखरेख

या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि शिधावाटप विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समित्या नेमल्या आहेत. या समित्या पात्र लाभार्थ्यांची यादी निश्चित करतील आणि त्यांच्या आधार कार्ड संलग्न बँक खात्यांची खात्री करतील. यामुळे, कोणताही गैरव्यवहार होणार नाही. या योजनेमुळे पात्र महिलांना दरमहा मिळणाऱ्या १५०० रुपयांच्या मदतीसोबतच वर्षाला तीन सिलिंडरचा अतिरिक्त लाभही मिळेल, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण होण्यास मदत होईल.

BSNL चा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन: 72 दिवसांच्या वैधतेसह रोज 2 GB डेटा!
BSNL चा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन: 72 दिवसांच्या वैधतेसह रोज 2 GB डेटा!

Leave a Comment

error: कॉपी होत नाही ⚠️ शेअर करा 📲