Ladki Bahin Yojna : महाराष्ट्रामध्ये महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महायुती सरकारने सुरू केली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ आता पूर्णतः कार्यान्वित झालेली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा १५०० रुपये जमा केले जात आहे. लवकरच ही रक्कम २१०० रुपयांपर्यंत वाढवली जाण्याची शक्यता आऊहे, ज्यामुळे या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना मोठा दिलासा मिळणार आहेत.
लाडकी बहीण योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये:
- योजनेचे नाव: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना
- प्रारंभ: जुलै २०२४ पासून
- लाभार्थी: २१ ते ६० वयोगटातील पात्र महिला
- मासिक रक्कम: सध्या ₹१५००, लवकरच ₹२१०० होण्याची शक्यता
- निधी: योजनेसाठी ₹१४०० कोटी रुपयांची तरतूद
यादीत तुमचे नाव आहे की नाही, असे चेक करा!
तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला असेल आणि तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे की नाही हे तपासू इच्छित असाल, तर खालील सोप्या पद्धतीने पहा:
- स्टेप १: तुमच्या स्मार्टफोनमध्ये ‘नारी शक्ती दूत’ ॲप उघडा आणि लॉगिन करावे.
- स्टेप २: ॲपच्या मुख्यपृष्ठावरील (डॅशबोर्ड) “लाभार्थी अर्जदारांची यादी” या पर्यायावर क्लिक करावे.
- स्टेप ३: त्यानंतर, तुमचा जिल्हा, तालुका, ब्लॉक आणि गाव निवडायचे.
- स्टेप ४: ‘शोधा’ (Search) बटणावर क्लिक केल्यावर तुमच्या गावातील लाभार्थी महिलांची यादी स्क्रीनवर दिसते.
या सोप्या प्रक्रियेमुळे तुम्ही घरबसल्या तुमचे नाव यादीत तपासू शकतात. आतापर्यंत २.५ कोटींहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला असून, त्यांना मिळणारा मासिक हप्ता मोठा आधार देत आहेत.