8 व्या वेतन आयोगामुळे ‘हे’ भत्ते मिळणार नाहीत; यादी चेक करा 8th Pay Commission

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन अपडेट समोर आली आहे, ज्यामुळे त्यांच्यात उत्सुकता आणि काही प्रमाणात चिंता दोन्हीचे वातावरण आहे. खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांप्रमाणेच सरकारी कर्मचारीही दरवर्षी वेतन आयोगाची आतुरतेने वाट पाहत असतात. पण आता ज्या आठव्या वेतन आयोगाची (8th Pay Commission) प्रतीक्षा सुरू आहे, त्यामुळे काही भत्ते रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोणते भत्ते रद्द होऊ शकतात?

सातव्या वेतन आयोगामध्ये एकूण १९६ भत्त्यांचा आढावा घेण्यात आला होता, ज्यातून ५२ भत्ते रद्द करून ३६ इतर भत्त्यांचा समावेश करण्यात आला. जाणकारांच्या मते, आठव्या वेतन आयोगातही अशीच प्रक्रिया होण्याची शक्यता आहे. या प्रक्रियेत कमी भत्ते, अधिक पारदर्शकता या सूत्रावर काम केले जाईल.

‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 127 कोटी रुपये पिक विमा थेट बँक खात्यात जमा; यादीत नाव पहा Crop Insurance Payment
‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 127 कोटी रुपये पिक विमा थेट बँक खात्यात जमा; यादीत नाव पहा Crop Insurance Payment

तज्ज्ञांच्या मते, डिजिटलायझेशनमुळे आणि नवीन प्रशासकीय प्रणालींमुळे काही भत्ते रद्द होऊ शकतात. यामध्ये मुख्यत्वे प्रवास भत्ता (Travel Allowance), स्पेशल ड्युटी अलाऊन्स, स्थानिक भत्ते आणि काही क्लार्क किंवा टायपिंगशी संबंधित विभागीय भत्ते यांचा समावेश असू शकतो.

पगारावर काय परिणाम होईल?

भत्त्यांमध्ये कपात होणे म्हणजे त्याचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर होणे. सहसा सरकार भत्ते कमी करून मूळ वेतन (Basic Pay) आणि महागाई भत्ता (DA – Dearness Allowance) वाढवण्यावर भर देते. यामुळे आर्थिक संतुलन राखता येते आणि पेन्शनधारकांनाही याचा फायदा मिळतो.

सोन्याच्या दरात मोठे बदल; आजचे लाईव्ह बाजार भाव येथे पहा Gold Silver Price
सोन्याच्या दरात मोठे बदल; आजचे लाईव्ह बाजार भाव येथे पहा Gold Silver Price

आठवा वेतन आयोग कधी लागू होईल आणि यातील नेमकी समीकरणे काय असतील, हे पाहणे महत्त्वाचे आहे. सध्या तरी शासनाने अधिकृत अधिसूचना जारी केलेली नाही. आयोगाच्या Terms of Reference (ToR) आणि अध्यक्षांची नियुक्ती झाल्यावरच वेतन संरचना, भत्ते आणि इतर शिफारसींबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.

नमो शेतकरी योजनेचा हप्ता 2000 रुपये तुम्हाला मिळणार का? येथे चेक करा Namo Shetkari 7th Installment List
नमो शेतकरी योजनेचा हप्ता 2000 रुपये तुम्हाला मिळणार का? येथे चेक करा Namo Shetkari 7th Installment List

Leave a Comment