Namo Shetkari Yojana Hafta afta: राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपली आहे. सरकारने ३ सप्टेंबर २०२५ रोजी ७व्या हप्त्यासाठी ₹१,९३२.७२ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या पात्रतेनुसार वेगवेगळ्या रकमेचा लाभ मिळणार आहे.
तुम्हाला किती पैसे मिळणार?
यावेळी केवळ ₹२,००० चा नियमित हप्ताच नाही, तर काही शेतकऱ्यांना ₹४,००० किंवा ₹६,००० पर्यंतची रक्कम मिळू शकते. हे कसं ते जाणून घ्या:
- ₹२,०००: ज्या शेतकऱ्यांना मागील सर्व हप्ते वेळेवर मिळाले आहेत, त्यांना सातव्या हप्त्याचे ₹२,००० मिळतील.
- ₹४,०००: ज्या शेतकऱ्यांचा मागील एक हप्ता थकीत आहे, त्यांना मागील हप्त्याचे ₹२,००० आणि या हप्त्याचे ₹२,००० असे मिळून एकूण ₹४,००० मिळतील.
- ₹६,०००: ज्या शेतकऱ्यांचे दोन हप्ते थकीत आहेत, त्यांना हे दोन्ही थकीत हप्ते आणि या हप्त्याचे पैसे मिळून एकूण ₹६,००० मिळतील.
हप्ता कधी जमा होणार?
जरी सरकारने निधी मंजूर केला असला, तरी तो शेतकऱ्यांच्या खात्यात नेमका कधी जमा होईल, याची कोणतीही निश्चित तारीख जाहीर केलेली नाही. मात्र, लवकरच हा ७वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होईल, अशी अपेक्षा आहे.